*लव जिहाद विरुद्धचा सामुहिक संघर्ष ही काळाची गरज*
लव जिहाद ची प्रकरण दिवसेदिवस वाढत चालली आहेत. देशाच्या कानकोपऱ्यातून या संबंधीचे वृत्त ऐकायला मिळत आहे. काळाची पावल ओळखून सावध राहणे आवश्यक आहे आणि म्हणूनच संपूर्ण हिंदू समाज आज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरत आक्रोश व्यक्त करत आहे. परंतु या समस्यांचे अवलोकन केल्या शिवाय समूळ निराकरण शक्य आहे काय ? किंवा एकांगी भूमिका मांडत केवळ मुलींवर दोषारोपण करून भागणार आहे का ? असे नाहीये. याचा चहूबाजूने विचार होणे गरजेचे.
१९ व्या शतकातील थोर समाज सुधारक आणि आर्य समाज सारख्या सुधारणावादी चळवळीचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा "रोटी बेटी व्यवहार" हा आंतरजातीय विवाह आंदोलनाचा विचार खऱ्या अर्थाने आजही किती प्रासंगिक आहे हे लक्षात येते. माणसाने विज्ञानाची कास धरून अफाट प्रगती केली. २१ व्या शतकाला विज्ञानवादी युग म्हणून संबोधले जाऊ लागले. परंतु आजही आपण कालबाह्य पारंपरिक समाज व्यवस्थेच्या बाहेर पडलो आहोत का ? याचा अर्थ परंपरा जपू नये असे मुळीच नाही. परंतु कालबाह्य परंपरा आणि मानवीय मूल्यांचे, सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करणाऱ्या परंपरा यात फरक आहे. हा फरक लक्षात आल्यास बहुतांश समस्यांचे निराकरण झाल्यात जमा आहे.
आर्य समाज चे संस्थापक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी जातीभेद निर्मुलना साठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना अनेक रूढीवादी चळवळीतील नेत्यांनी कडाडून विरोध केला. पुढे स्वामी दयानंद सरस्वती यांचा हाच वारसा आर्य समाज च्या कार्यकत्यांनी नेटाने चालू ठेवला. देशात आजवर लाखोच्या संख्येने आंतरजातीय विवाह आर्य समाज ने लावले. त्या विरुद्ध ही रूढीवादी विचारधारेच्या नेत्यांनी मा.सर्वोच्च न्यायालयात आर्य समाज चा कडाडून विरोध केला. परिणामी या आंदोलनाची धार गेल्या काही वर्षांपासून मंदावलेली दिसली.
२१ व्या शतकात रूढीवादी विचारधारेला समाजातून मिळालेलं सहकार्य हे देखील वाढत्या लव जिहाद चे ठळक कारण आहे. माफी असावी परंतु याहून ही जळजळीत वास्तव म्हणजे मद्यपान, धूम्रपान, तंबाखू, गुटखा आदी व्यसनाच्या विळख्यात हिंदू तरुणाईचे भविष्य अंधारात चालले आहे. या व्यसनाने तो दिवसेंदिवस आळशी, प्रमादीही होत चालला आहे. परिणामी इंदुरीकर महाराजांच्या भाषेत अनेकांची जवळ जवळ रेंज गेली परंतु दूरदूरवर कुठेही संधी दिसून येत नाही.
काही प्रमाणात घरून मुलींच्या आई वडिलांची भूमिका ही वाढत्या लव जिहाद ला खतपाणी घालण्या जोगी आहे. स्वदेशी भाषा, स्वदेशी वेशभूषा, स्वदेशी खानपान हे लहानपणा पासूनच मुलींच्या जीवनाचा अविभाज्य घटक असायला हवा. त्याच बरोबर काही सामाजिक सेवाभावी संस्था, धार्मिक संस्था यांच्या द्वारे कन्या आत्मरक्षा व चरित्र निर्माण शिबिराचे आयोजन ही मोठ्या स्तरावर होणे गरजेचे. या शिबिरांच्या साठी शासकीय स्तरावर आर्थिक मदतीच्या उपाययोजना आखत्या आल्या तर ती एक पर्वणीच ठरेल. मुलींनी ही घरातील थोरा मोठ्यांचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे. घरातील वरिष्ठ मंडळी वायफळ कुणी बोलत नसते या मंडळींचे बोल हे अनुभवाचे असतात हे मुलींनी सर्वप्रथम ह्दयी आत्मसात केले पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाल्यांनी आपल्या मुली सोबत सातत्याने मित्रा प्रमाणे संवाद ठेवला पाहिजे. आणि जे संस्कार आद्रटी इतरांचे पाहून देण्याचा प्रयत्न होतो आहे तो प्रयत्न मुलीच्या बाल्यावस्थे पासून होणे गरजेचे आहे. मुलगा आणि मुलगी जात सोडून प्रेमात आहेत तर त्या कडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही १९ व्या शतकातील मानसिकतेच्या बाहेर पूर्णतः पडलेला नाही. या आणि अश्या अनेक गोष्टींचे अवलोकन केल्यास लव जिहाद विरुद्ध सामूहिक संघर्ष शक्य वाटतो. परंतु हा सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे.
.
© *रोहित जगदाळे पाटील*
- परभणी, महाराष्ट्र.
Comments
Post a Comment