हिंदुनो आता तरी सावध व्हा.

जादुटोना, फलित-ज्योतिष, भुत-पिशाच, बुआबाजी आणि अवतारवाद या संदर्भहीन, तर्कहीन मान्यते मुळे हिंदु समाजाचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढे नुकसान बाह्य आक्रांतां पासून ही झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. अगदी मुगल काळा पासून ते ब्रिटिशांच्या पर्यंत असे अनेक ऐतिहासिक दाखले देता येतील ज्याने स्पष्ट होईल की या तर्कहीन मान्यते मुळे हिंदु समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे.या गोष्टी सातत्याने आर्य समाज ने अधोरेखित केल्या आहेत.आजही या मान्यता हिंदु समाजाला पोखरण्याचे काम करीत आहेत. कथित धार्मिक ठेकेदारांनी धर्माच्या नावे धंधा मांडला असुन डॉ जाकीर नाईक सारखा इस्लामिक स्कोलर जेव्हा या ठेकेदारांना ललकारतो तेव्हा हे ठेकेदार पळ काढताना दिसून येतात. समाजात धर्मगुरू म्हणून मिरविताना ख्रिस्ती समुदायाचे सण साजरे करताना दिसतात. पुढे हेच कथित धर्मगुरू बाबा रामरहीम, आसाराम, बाबा रामपाल, नित्यानंद सारखे चेहरे म्हणून उघडकीस येतात. बाबा रामपाल याच्या सतलोक आश्रम मधे अश्लील साहित्य, अश्लील उपकरण मिळाले होतेच. त्याच बरोबर त्याच्यावर देशा विरुद्ध युद्ध पुकारण्याचा आरोप करण्यात आला होता. कारण त्याच्या आश्रमात अनेक विध्वंसक हत्यार आणि पेट्रोल बॉम्ब पोलिसांनी हस्तगत गेले होते. आश्रमावर कार्यवाही होऊ नये म्हणून त्याने अनेक भाविकांना ओलीस ठेवल्याचे ही प्रकरण समोर आले होते. आता स्वामी नित्यानंद ची "युनायटेड स्टेट ऑफ कैलास" नावाची एक महिला प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र संघात भारता विरुद्ध गरळ ओकताना नुकतीच दिसून आली आहे. हिंदु समाजाने आता तरी सावध व्हावे. या चुकीच्या मान्यते पासून दूर रहावे. स्वतःच्या पुरुषार्थावर विश्वास ठेवावा. धर्म ही एक जीवन जगण्याची पद्धती असून मनुष्यमात्रासाठी तिचे वास्तविक ज्ञान वेदांच्या मधे आहे. त्या मुळे अवैदिक मताचे महिमामंडण देश, समाज आणि मनुष्यमात्र्याच्या अधोगतीचे कारण बनू शकते हे समजून घ्यावे आणि इतरांना ही समजून सांगावे.
.
©रोहित जगदाळे पाटील
परभणी, महाराष्ट्र.

Comments