नव काँग्रेसींनो १० जनपथ ची चाकरी म्हणजे काँग्रेस नाही.
गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे गांधी अशी धारणा करणाऱ्या नव काँग्रेसींना काँग्रेसचा गंध नाही. मुळात काँग्रेस ची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी ए. ओ ह्युम या इंग्रजाने केली. जो थिओसॉफिकल सोसायटी चा सदस्य होता. आणि थिओसॉफिकल सोसायटी हे आधुनिक काळातील एक धार्मिक आंदोलन होते. थिऑसʼ आणि ‘सोफियाʼ या दोन ग्रीक शब्दांपासून ‘थिऑसॉफीʼ हा शब्द तयार झाला आहे. १० एप्रिल १८७५ रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे हिंदू सुधार आंदोलन म्हणून आर्य समाज ची स्थापना केली तर तिकडे थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना १७ नोव्हेंबर १८७५ रोजी न्यूयॉर्क येथे झाली होती.रशियन विदुषी हेलेना प्यिट्रॉव्हन्य ब्लॉव्हॅटस्की आणि अमेरिकन लष्करी अधिकारी कर्नल हेनरी स्टील ऑलकट हे या संस्थेचे संस्थापक होते.
अमेरिकेत स्थापन झालेल्या या संस्थेचा प्रसार मात्र भारतात झाला. परंतु त्या प्रचार प्रसाराला सुरुवातीच्या काळात हाथभार आर्य समाज चा होता. जो कालांतराने कमी झाला आणि भारतात थिऑसॉफिकल सोसायटीची चळवळ मंदावली.
अमेरिकन लष्करी अधिकारी कर्नल हेनरी स्टील ऑलकट यांची भेट मुळजी ठाकरे या भारतीय हिंदुशी झाली. ही भेट १८७० साली झाली होती. तेव्हा आर्य समाज आणि थिऑसॉफिकल सोसायटी ची स्थापना ही झालेली नव्हती. १८७७ म्हणजे भेटी नंतर सात वर्षांनी ऑलकट आणि मूळजी ठाकरे यांच्यात एक पत्रव्यवहार झाला. ज्यात ऑलकट यांनी थिऑसॉफिकल सोसायटी ची उद्दिष्ट्ये आणि मूळजी ठाकरे यांनी आर्य समाज ची उद्दिष्ट्ये नमूद केली. मानवतेला सामावून घेणाऱ्या समसमान उदिष्टांच्या आधारावर एकत्र काम केल्या जाऊ शकते म्हणून थिऑसॉफिकल सोसायटी आणि आर्य समाज ने जागतिक पातळीवर एकत्र आले पाहिजे अश्या आशयाचे पत्र व्यवहार ऑलकट यांनी आर्य समाज चे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्याशी चालू ठेवले. या साठी थिऑसॉफिकल सोसायटी ने एक जाहीर शाखा लंडन येथे स्थापन २७ जून १८७८ रोजी स्थापन केली ज्याला नाव दिले "ब्रिटिश थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ आर्यावर्त" तत्पूर्वी १८७७ साली थिऑसॉफिकल सोसायटी चे संस्थापक मुंबई येथे येऊन स्वामी दयानंद सरस्वती यांना भेटले होते. परंतु
थिऑसॉफिकल सोसायटी चे पारडे ख्रिश्चन धर्मा कडे अत्यधिक झुकलेले आहे. मानवतेचा उदार दृष्टिकोन आणि समाजाप्रती स्वतःची ठोस भूमिका त्यांच्या कडे नाही. शिवाय रूढीवादी हिंदू समाजा बद्दलची तळमळ ही नाही अश्या अनेक मुद्द्यावर पुढे थिऑसॉफिकल सोसायटी आणि आर्य समाज मधे मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झाले आणि साल १८८१ साली दोघांच्या संयुक्त कार्यक्रमास पूर्णविराम लागला. आणि या पूर्णविरामा सह थिऑसॉफिकल सोसायटी ची भारतातील चळवळ ही थंडावली. १८८० चे हे दशक स्वदेशी चळवळीचे दशक म्हणून ओळखले जात होते. आर्य समाज ची सुधारणावादी चळवळ देशभर फोफावत होती. आणि त्याला विरोध म्हणून रूढीवादी चळवळ ही पुढे येत होती. परंतु या दोन्ही चळवळीच्या मुळाशी हिंदू समाजच होता. आणि या दोन्ही चळवळी हिंदूच्या हितासाठी आम्ही खरा संघर्ष करीत आहोत अश्या प्रकारचे दावे प्रतिदावे करीत होत्या. या दोन्ही चळवळीचा पुढे काँग्रेस मधे शिरकाव झाला. "लाल,बाल,पाल" ही तिकडी त्या वेळी सर्वश्रुत होती. यात लाला लाजपत राय आणि बाळ गंगाधर टिळक हे काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते मानल्या जायचे. दोन्ही जहाल मतवादी परंतु लालाजी सुधारणावादी आर्य समाजी चळवळीतून पुढे आलेले तर लोकमान्यांवर रूढीवादी हिंदू चळवळीचा प्रामुख्याने प्रभाव. काँग्रेस मधे चाहे सुधारणावादी आर्य समाजी चळवळ असो की रूढीवादी हिंदू चळवळ. या दोन्ही चळवळीत केवळ हिंदूंचे हित जोपासले जाते म्हणून वैतागून पुढे ३० डिसेंबर १९०६ रोजी मुस्लिम लीग ची स्थापना झाली. मोहनदास गांधी यांची काँग्रेस मधील एंट्री तर खूप नंतरची. वयाच्या ४५ व्या वर्षी गांधी १९१५ साली भारतात परतले होते. त्या नंतर चार पाच वर्षांनी म्हणजे साधारण १९१८ ते १९२० च्या पुढे गांधी काँग्रेस मधे सक्रिय झाले. म्हणजे काँग्रेस ची स्थापना झाल्या नंतर तब्बल ३४ ते ३५ वर्षा नंतर गांधी काँग्रेस मधे सक्रिय झाले. तोवर काँग्रेस मधे अनेकांनी स्वतःचे तारुण्य झोकून देऊन स्वतःस राष्ट्रीय कार्यात वाहून घेतले होते. एकीकडे लाला लाजपत राय, स्वामी श्रद्धानंद यांच्या सारख्या सुधारणावादी आर्य समाजी नेत्यांनी काँग्रेस मधे आयुष्य वेचले होते तर दुसरीकडे लोकमान्य टिळकां सारख्या रूढीवादी नेत्यांनी ही काँग्रेस च्या माध्यमातून आयुष्य पणाला लावले होते. इतिहासाला कतीती लपविण्याचा प्रयत्न केला तर इतिहास लपत नाही. तो सूर्यप्रकाशा प्रमाणे स्वच्छ असतो. गांधी नेहरू म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे गांधी नेहरू ही कुस्तीत मानसिकता आणि गुलाम मानसिकता झटकून नव काँग्रेसी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस चे ज्येष्ठ इतिहासकार पट्टाभी सितारामैय्या यांनाही थोडे वाचावे. आत्मसात करावे.
.
- © रोहित जगदाळे पाटील
परभणी, महाराष्ट्र.
Comments
Post a Comment