*हैद्राबाद मुक्ती संग्रामातील अमृत महोत्सव निमित्त विशेष लेखमाला (भाग ४)*

         वाचक मित्रांनो बंधू भगिनींनो आणि पितृतुल्य ज्येष्ठ मंडळींनो सादर , सस्नेह नमस्ते
         मागील सर्व भागात आपण अनुक्रमे पाहिले १८९२ साली संस्थानात झालेली आर्य समाज ची स्थापना. पुढे १९२४ साली हुसैन सिद्दीकी चे दीनदार अंजुमन संगठने द्वारे झालेले आगमन पुढे १९२७ साली मजलिस ची झालेली स्थापना त्याला १९३८ ला बहादुर यार जंग कडून मिळालेले बळ. दरम्यान च्या काळात दीनदार अंजुमन आणि मजलिस कडून जिन्नाच्या इशाऱ्यावर सुरू असलेली धर्मांतरणाची चळवळ. त्याला प्रतिकार म्हणून सुरू झालेली संस्थानातील आर्य समाज ची शुद्धी चळवळ, त्यातून झालेल्या आर्य समाजी नेत्यांच्या गुंजोटी, बस्वकल्याण येथील १९३७ मधील हत्या, तत्पूर्वी १९३५ मधे निलंगा येथील आर्य समाज मंदिर वर झालेला हल्ला. १९३८ साली उदगीर येथे दसरा यात्रेत आर्य समाजी नेत्यांवर झालेला गोळीबार, आर्य समाजी नेते भाई श्यामलाल यांना झालेली अटक त्यांच्यावर झालेला जेल मधील विषप्रयोग, पुढे १९३८ ते १९३९ दरम्यान देशभरातून सुमारे १५००० आर्य समाजीयांना झालेली जेल,पुढे बहादुर यार जंग चा १९४४ साली झालेला अकाली मृत्यू या सर्व घटना आपण पाहिल्या.
          हे सगळे आंदोलनाचे वातावरण निर्माण झाल्या नंतर साल १९३८ साली हिंदू महासभा, स्टेट काँग्रेस, आंध्र महासभा, कम्युनिस्ट यांचे आगमन झाले. परंतु तत्पूर्वी या धार्मिक संघर्षाला हिंदूच्या बाजूने संस्थानात प्रामाणिक पने लढा देणारी एकवेव संगठना ही आर्य समाज होती हे त्रिकालबाधित सत्य आहे. बहादूर यार जंग च्या अकाली निधनानंतर मजलिस ची आधिकरीक सूत्र कासिम रिझवी कडे गेली पुढे १९४४ ते १९४६ दरम्यान रिझवी याने सुमारे २ लाख सशस्त्र सेना संस्थानात या मजलिस च्या सहायाने उभी केली. जी "रजाकर" या नावाने ओळखली गेली. हा रिझवी निजाम चा प्रधान वकील म्हणून संस्थानात परिचित. १९४७ ते १९४८ दरम्यान याने संस्थानातील नागरिकांवर अत्याचार सुरू केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळाले परंतु जिन्नाच्या इशाऱ्यावर चालणारी मजलिस माघार घ्यायला तैयार नव्हती. भारतात विलीन होण्यास नकार देत होती. दरम्यान च्या काळात भारत सरकारने अनेक वेळा चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु हाती काहीच लागत नव्हते. या उलट संस्थानातील बहुसंख्यक हिंदुंना क्रूर रजाकारी छळास सामोरे जावे लागले. अखेर दिवस ठरला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी दिनांक १३ सप्टेंबर १९४८ रोजी "ऑपरेशन पोलो" होणार अशी घोषणा केली गेली. भारतीय सैन्याला १० दिवसात संस्थान काबीज करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी देऊ केले. परंतु आर्य समाज, हिंदू महासभा, स्टेट काँग्रेस आदी द्वारे चालवले गेलेल्या आंदोलना मुळे जुलमी रजाकारी विरुद्ध संस्थानातील जनतेने सर्वोपरी भारतीय लष्कराला केली आणि अवघ्या साडेतीन दिवसात सर्व महत्त्वाच्या तळांवर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. आणि अखेर १७ सप्टेंबर १९४८ ला निजाम ने बिनशर्त शरणागती पत्कारली. भारतीय लष्कराच्या ३२००० जवानांनी यात सहभाग नोंदविला होता आर्म्ड ब्रिगेड, स्मॅश फोर्स, स्ट्राइक फोर्स, मोर्टर बटालियन, गुरखा रायफल्स, पंजाब रेजिमेंट्स तर होतेच शिवाय हवाई हल्ल्यासाठी हवाई दल ही सहभागी झाले होते. या ऑपरेशन मधे लष्कराचे ३२ जवान शहीद झाले होते तर जवळपास शेकडो जवान जखमी झाले होते. 
        शरण आल्या नंतर "आपण जनतेच्या बाजूनं होतो पण 'मजलिस-ए-इत्तेहादूल-मुसलमीन' आणि त्याचा कर्ता कासिम रिझवी संस्थान सोडायला तयार नव्हते" अश्या प्रकारची मांडणी निजामने केली. २७ ॲक्टोबर १९४७ रोजी कासिम रिझवी याने निजाम कडून सर्व सूत्रे हाती घेऊन ती दिवाण लायक अली यास सोपवली. असे सांगण्यात येते की लायक अली कडे सर्व सूत्रे गेल्याने निजाम चे अधिकार संपुष्टात आले. या संदर्भात वी.पी मेनन यांनी आपल्या सर्व संस्थानिकांच्या इतिहासावरील पुस्तकात लिहून ठेवलेले आहे. भारत सरकार ची चर्चा तेव्हा निजाम सोबत जव्हे तर लायक अलीशी चालू असल्याचे बोलले जाते. पुढे २६ जानेवारी १९५० ला निजमास हैद्राबाद राज्याचे पहिले राज्यपाल बनविले गेले. सैन्य कार्यवाही झाली तेव्हा लायक अली पळून गेला.कासिम रिझवी यास अटक झाली. त्याला ७ वर्षाची शिक्षा झाली. पुढे तो ही सुटला आणि पाकिस्तानात निघून गेला. अश्या पद्धतीने एका रक्तरंजित ऐतिहासिक घटनाक्रमाची रूपरेषा आपण एकूण चार भागामध्ये पाहिली आहे. अपेक्षा करतो की आपणास या ऐतिहासिक भागांची लेखमाला आवडली असेल. 
.
समाप्त
© रोहित जगदाळे पाटील
परभणी, महाराष्ट्र.
(लेखक जगदाळे हे हैद्राबाद संस्थानातील १०४ वर्षीय ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी स्वामी श्रद्धानंद सरस्वती (पूज्य हरिश्चंद्र गुरुजी) यांचे नातू आहेत)

Comments

Popular posts from this blog

हिंदुनो आता तरी सावध व्हा.

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा स्वामी विवेकानंद का आग्रह क्यों?*

नव काँग्रेसींनो १० जनपथ ची चाकरी म्हणजे काँग्रेस नाही.