*कोवळ्या वयातील अनुभवलेला थरार, सोनिया गांधी च्या हुकुमशाही धोरणांची अनुभूती, खरा जालियनवाला बाग हत्याकांड* .
*भाग २*
.
दि.०७.१०.२०२१
.
नमस्ते मित्रांनो.
मी रोहित जगदाळे, आज आपणा समोर पुन्हा एकदा काल सांगितलेल्या घटनेचा उत्तरार्ध घेऊन आलेलो आहे. मागच्या लेखात आपण एक दशक अगोदर दि.४ जून २०११ रोजी च्या काळरात्री सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील जुलमी राजसत्तेच्या क्रूरतेची आणि बर्बरतेची कहाणी ऐकली. भ्रष्टाचार विरोधी देशव्यापी जनआंदोलनास ब्रिटिशांच्या आणि मुगलांच्या पेक्षा ही क्रूर पद्धतीने सूर्यास्ताच्या नंतर, गाढ झोपेत असलेल्या व लाखोच्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांना, रामलीला मैदान नवी दिल्ली येथे, ज्या प्रकारे रात्री अपरात्री लाठीचार्ज करून, गोळीबार करून प्रताडीत केल्या गेले. ज्यात शेकडो आंदोलनकारी जखमी झाले आणि राजबाला ताई सारखी वीरांगना त्या ठिकाणी शहीद झाली. त्या आंदोलनास समर्थन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या कार्यालया बाहेर मी माझ्या भारत स्वाभिमान आंदोलन च्या सहकाऱ्यांच्या सह आमरण उपोषणाला बसलो होतो. UPA २ शासनाचे धाबे दणाणले होते. म्हणून आंदोलनाला चिरडून योगऋषी स्वामी रामदेव जी महाराज यांना जीवे मारण्याचे मोठे षडयंत्र त्या ठिकाणी रचले गेलेे होते. तो थरार आम्ही प्रत्यक्ष टीव्ही वरती लाईव्ह टेलिकास्ट ने जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर अनुभवत होतो. आणि डोळ्यात आसवांनी घर केले होते. तेव्हा माझे वय वर्ष अवघे १९ परंतु या घटने नंतर मन हेलावले, अन्याया विरुद्ध पेटून उठले. ठरवल.. आता स्वामी रामदेवजी आवाज देतील तेव्हा दिल्ली गाठायची.. आणि या मस्त्वाल जुलमी शासनाची मस्ती जिरवायची..४ जून २०११ चे आंदोलन चिरडल्याच्या नंतर १५ ऑगस्ट २०११ चा दिवस उजडला. भारत स्वाभिमान आंदोलन च्या युवा भारत शाखेच्या परभणी जिल्हा सह प्रभारी पदाची धुरा तेव्हा मी सांभाळत होतो. आंदोलन चिरडल्याच्या नंतर पुढील दिशा काय असेल या संदर्भात एक मोठे युवा भारत अधिवेशन (युवा भारत प्रशिक्षण शिबिर) पतंजली योगपीठ, हरिद्वार, उत्तराखंड येथे बोलावण्यात आले. जे दि.१५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०११ पर्यंत चालले. ज्यात मी सहभागी होण्या हरिद्वार गाठले. त्या वेळी दिल्लीत अण्णा हजारे आमरण उपोषणाला बसलेले होते. आणि त्यांचे ही आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सोनिया गांधी प्रणित केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करू पाहत होते. या युवा भारत प्रशिक्षण शिबिर म्हणजेच अधिवेशा दरम्यान स्वामी रामदेवजी यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. आणि दिनांक ५ जून २०१२ रोजी पुन्हा एकदा देशभर प्रत्येक जिल्हा निहाय तीन दिवसीय धरणे आंदोलनाची हाक दिली. ज्यात परभणी जिल्ह्यातील माझ्या सहकाऱ्यांच्या सह मी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सहभागी झालो. हा सोनिया गांधींच्या काँग्रेस प्रणित केंद्र सरकारला शेवटचा निर्वाणीचा इशारा होता. या धरणे आंदोलनात स्पष्ट केले गेले होते की आम्ही शेवटची संधी देत आहोत. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र ९ ऑगस्ट २०१२ रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून देशभरातून लाखो तरुणांनाची फौज दिल्लीवर धडक देईल. वेळ प्रसंगी संसदेला घेराव घालण्यात येईल.
झाले ही तसेच. सोनिया काँग्रेस प्रणित मस्तावलेल्या केंद्र सरकारने सर्व मागण्या धुडकावून लावल्या. बहुतेक ४ जून २०११ रोजी केलेल्या हुकुमशाही धोरणांची पुनरावृत्ती करण्या साठी त्यांचे आसुरी मन उस्तुकतेच्या लाटेवर स्वार होऊन मोठ्या दडपशाहीच्या प्रयत्नात होते. परंतु या वेळी ते शक्य नव्हते. जबरदस्त नियोजनाने आंदोलनाची रूपरेषा आखण्या युवा भारत चे दुसरे अधिवेशन पतंजली योगपीठ, हरिद्वार, उत्तराखंड येथे २५ जुलै २०१२ रोजी बोलावण्यात आले. ज्यात परभणीतील माझे सहकारी अंकुश मदनवाड आणि अजुन काही तरुण मंडळी सहभागी झालो होतो. ७ दिवसाच्या नियोजना नंतर आम्हाला दि. २ ऑगस्ट २०१२ रोजी पतंजली योगपीठ हरिद्वार येथून दिल्ली कडे रवाना करण्यात आले. महाराष्ट्रातून ही हजारो च्या संख्येने तरुण २५ जुलै च्या त्या नियोजन शिबिरात आलेले होते.
दिनांक २ ऑगस्ट २०१२ रोजी आम्ही दिल्ली येथील रामलीला मैदानावर आलो. आणि महाराष्ट्रातील तरुणांना "सुरक्षा व्यवस्था" सारख्या महत्त्वपूर्ण खात्याची जिम्मेदारी देण्यात आली. दिवस उजडला, क्रांती दिवस ९ ऑगस्ट २०१२ स्वामी रामदेव जी यांनी "आर या पार" च्या आंदोलनाची हाक दिली. देशाच्या काना कोपऱ्यातून लाखोच्या संख्येने आंदोलनाचे जत्थे च्या जत्थे दिल्लीच्या रामलीला मैदानावर धडकत होते. अर्थात या मागे दिड दोन वर्षां पासूनचे जबरदस्त नियोजन व योग ऋषी स्वामी रामदेव जी महाराज यांचा २०११ ते २०१२ हा संपूर्ण वर्षाचा देशात केलेला लाखो किलोमीटर चा प्रवास ही कारणीभूत होताच. जवळपास ५ लाखा पेक्षा अधिकचा जनसागर राजधानी दिल्लीत धडकला होता. रामलीला मैदानावर पाय ठेवायला ही जागा शिल्लक नव्हती. अनेक आंदोलनकर्त्यांनी मैदनाच्या बाहेर असलेल्या फूट पाथवर मुक्काम वळवला होता. ९ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट चार दिवस लाक्षणिक उपोषण चालले. तरीही सरकार कडून कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या जात नसल्याचे पाहून स्वामी रामदेव जी यांनी सिंह गर्जना केली. "याचना नहीं अब रण होगा संग्राम बड़ा भीषण होगा" असे स्पष्ट उच्चारून "चलो संसद की और" असा नारा दिला. आणि ५ लाखांच्या पेक्षा अधिकचा हा जनसागर रामलीला मैदानावरून संसद भवन कडे कूच करण्या दिनांक १२ ऑगस्ट २०१२ रोजी निघाला.
मैदाना वरून रस्त्यावर येताच हा थरार अनुभवण्या सारखा होता. आम्ही महाराष्ट्रातील तरुणांनी साखळी तैय्यार करून स्वामीजी च्या अवतीभोवती घेराव घातलेला होता. त्याचे कारण कुठल्याही क्षणी "स्वामी रामदेव यांना अटक करा" असा आदेश येऊन धडकणार होता. २० हजार पोलिस जवानांचा बंदोबस्त, संपूर्ण दिल्लीला छावणीमध्ये रूपांतरित करीत होते. पोलिसांच्या हजारो गाड्या ही होत्या. मोठाल्या मीडिया हाऊसच्या हजारो गाड्या त्या ठिकाणी आम्हाला लाईव्ह कव्हर करीत होत्या. दिल्ली पोलिस तमाम मोठ्या ऑफिसर च संपूर्ण पथक त्या ठिकाणी तैनात होत. २० हजार पोलिस जवानांचा बंदोबस्त आणि ५ लाख आंदोलनकर्त्याचा जनसागर मुंगीच्या पाऊलांनी संसद भवना कडे सरसावत होता. आंदोलनकारी रामलीला मैदान दिल्ली ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम इतके अंतर कापून पुढे जातच होते तितक्यात पोलिसांनी बैरिकेट लावले. वॉटर कैंनन च्या गाड्यांचे सायरण वाजवले. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांचे एक पथक स्वामी रामदेव जी यांच्या गाडीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागले. अटकेचे आदेश निघाले होते.
दिल्ली पोलीसच पथक जवळ येताच आम्ही सुरक्षेत तैनात असलेल्या तरुणांनी पोलिसांच्या गाडीच्या चाकातील हवा सोडायला सुरुवात केली. स्वामी रामदेव जी यांच्या गाडीच्या समोर लोटांगण घालून रस्त्यावर झोपायला सुरुवात केली. तितक्यात धो धो मुसळधार पाऊस ही सुरू झाला. परंतु एकही आंदोलनकारी हटण्याच्या मनस्थिती मधे नव्हता. आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करीत होते. ते प्रत्येक प्रयत्न उधळून लावण्यासाठी आम्ही तरुण त्या ठिकाणी मोठ्या धीराने उभा होतो. वय वर्ष अवघे २० होते माझे. स्वामी रामदेवजी यांनी दिल्ली पोलिसांना सुनावले. "मुझे गिरफ्तार किया जाएगा तो यहां पर समर्थन में उमड़ा यह जनसैलाब खामोश नहीं बैठेगा, इन्हे भी गिरफ्तार आपको करना होगा, जेल भरो आंदोलन होगा" परिस्थिति अत्यंत नाजुक होत चालली होती. कुठल्याही प्रसंगी काहीही होऊ शकत होते. लाठीचार्ज, गोळीबार काहीही. शिवाय आम्हा महाराष्ट्रातील कोवळ्या वयातील पोरांना तो मुलुख परदेशी असल्या सारखाच. कुठ परभणी आणि कुठ ती दिल्ली.
अश्या संवेदनशील प्रसंगी घरी फोन लावला. आईला म्हणालो "आई आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मधे जेल भरो आंदोलन अंतर्गत डांबून ठेवतील किंवा काहीही होऊ शकेल, कदाचित लाठीचार्ज करून पांगवा पांगवी ही होऊ शकते, मी आंदोलनात सहभागी झालो आहे, काय करू, जाऊ का पुढे, की माघार घेऊ ?" तेव्हा आईच मन नक्कीच हेलावल. पण वडिलांनी आईच्या हातातील फोन घेतला "मागे अजिबात हटायच नाही, बिनधास्त लढायच, माझा एक मुलगा देशासाठी दिलाय असे समजेल जीवाला, पण माघार घ्यायची नाही, पूर्ण ताकदीने लढ, माघार घेण्या साठी तुला पाठवलेले नाही" अश्या शब्दात वडिलांनी धीर दिला. या घटनेचे साक्षी जिंतूर चे आमचे शेप गुरुजी आहेत. त्या आंदोलनात गंगाखेड चे निखिल वंजारे हे माझे युवा भारत चे तत्कालीन जिल्हा प्रभारी आणि आतचे पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी ही सामील होते.
वडिलांच्या कौतुकाच्या थापेने मग मात्र सुटकेचा निःश्वास सोडला आणि मोठ्या त्वेषाने सामील झालो. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे ३ दिवसांची जेल भोगली. वरून धो धो पाऊस आणि खाली स्टेडियम मधील गवत अशी ही तीन दिवसांची जेल होती. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्या तमाम काँग्रेसी नेत्यांना माझे सांगणे आहे. गेल्या ८ महिन्या पासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. तुमच्या काळातील केंद्र सरकार सारखा पवित्रा पूर्ण बहुमत असलेल्या नरेंद्र मोदीजी यांच्या केंद्र सरकारने कधीच घेतलेला नाही. त्या मुळे जालियनवाला बाग ची पुनरावृत्ती करणारे खरे कोण, कोण जनरल डायर, मोदी की सोनिया गांधीं. ? हे स्वतःचे स्वतःला विचारा.
.
लेखक
रोहित जगदाळे पाटील
परभणी, महाराष्ट्र.
(पूर्व भारत स्वाभिमान आंदोलन परभणी विधानसभा प्रभारी,
पूर्व जिल्हा सह प्रभारी, पतंजली युवा भारत, परभणी)
.
(जिल्हाध्यक्ष - भाजपा कामगार आघाडी, परभणी महानगर.)
Comments
Post a Comment