*कोवळ्या वयातील अनुभवलेला थरार, सोनिया गांधी च्या हुकुमशाही धोरणांची अनुभूती, खरा जालियनवाला बाग हत्याकांड*.


*भाग १*
.
दि.०६.१०.२०२१
.
नमस्ते मित्रांनो.
         मी रोहित जगदाळे, आज आपणास एक दशक मागे मुद्दाम हुन घेऊन चाललो आहे. शीर्षक वाचून आपणास लेखनाचा आशय समजला असेलच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खीरी या ठिकाणच्या घटनेला "जालियनवाला बाग" हत्याकांड शी तुलना करून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर टीकास्त्र सोडले आहे. आणि आता त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेतृत्वाने ही मोदी आणि शाह जोडीला जनरल डायर ची उपाधी देऊ केली आहे. राजकारण म्हटले की टीका टीपणी ही चालतच असते. परंतु सोईस्कर दृष्ट्या लोकशाही राज्यातील लोकशाही मूल्यांची उजळणी ही हुकुमशाही च्या चौकटीत बांधू पाहणे ही काँग्रेसची जुनी सवय आहे. अगदी स्व.इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील राष्ट्रीय आणीबाणी पासून ते सोनिया गांधी यांच्या हुकुमशाही धोरणा पर्यंत. सत्ता ही निर्लज्ज पने हुकुमशाही प्रमाणे कशी राबवावी याची एक मोठी शृंखला काँग्रेस पक्षाने जतन करून ठेवलेली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना ती बहुदा दिसली नसावी किंवा नजरेआड करायची असावी. मी नुकताच इयत्ता १२ वी ची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालो होतो. आणि महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत होतो. वर्ष २००९ साली देशात भारत स्वाभिमान आंदोलन या स्वदेशी आंदोलन ने धुमाकूळ घातला होता. परम पूज्य स्वामी रामदेवजी आणि स्व.भाई राजीव दीक्षित जी यांच्या स्वदेशी आंदोलन ने सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी केंद्र सरकारचे धाबे दणाणले होते. UPA २ मधे एका मागोमाग एक लाखो करोड रुपयांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे देशभर निघत होती. आणि देशात २० लाख किलोमीटर पेक्षा अधिकची यात्रा करीत योग ऋषी स्वामी रामदेव जी काँग्रेस शासित केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण मालिका जनते समोर मांडत होते. या वेळी देशातील तरुणाई रत्यावर उतरून अन्यायायच्या विरोधात आपला आवाज बुलंद करत होती. आणि त्याला बळ देत होते भारत स्वाभिमान आंदोलन व स्वामी रामदेव जी. मी ही या आंदोलनात अगदी सक्रिय सहभागी झालो. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी या तालुक्यात गावोगावी प्रवास केला. ग्रामपंचायत प्रमुख हस्ताक्षर अभियानाला सुरुवात केली. आणि दिनांक ४ जून २०११ रोजी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अनिश्चितकाळासाठी पुकारण्यात आलेल्या आमरण उपोषणाला बसलो. भ्रष्ट्राचार विरोधी हे  जनआंदोलन योग ऋषी स्वामी रामदेव जी यांच्या नेतृत्त्वात दिल्ली येथील रामलीला मैदानावर सुरू झाले होते.
मित्रांनो परंतु दुर्भाग्य पूर्ण रित्या हे सांगावेसे वाटते की त्या त्याच रात्री , अगदी सुर्यास्ताच्या नंतर, दिल्ली येथील रामलीला मैदानावर सर्व आंदोलनकारी वृद्ध महिला व पुरुष, लहान मूल बाळं अगदी गाढ झोपेत असताना, त्यांच्यावर अचानक पोलिसांनी बर्बर लाठीचार्ज केला, अश्रुधांरेच्या नळकांड्या फोडल्या, देशाच्या इतिहासात मुगल आणि इंग्रजांनी ही सूर्यास्ताच्या नंतर गाढ झोपेत असलेल्या आंदोलनकर्त्यांना अश्या प्रकारे अमानुष स्वरूप चिरडण्याचा प्रयत्न केला नाही जो प्रयत्न UPA प्रणित काँग्रेसच्या केंद्र सरकारने केला. यात शेकडो आंदोलनकारी जखमी झाले, बहन राजबाला ताई यांना वीर मरण आले. स्वामी रामदेव जी यांच्या सारख्या सन्यासी संताला जिवंत मारण्याचं कारस्थान रचल्या गेलं. हा थरार आम्ही प्रत्यक्ष टीव्ही वरती जिल्हाधिकारी कार्यालय समोर थाटलेल्या टेंट मधे अनुभवला आणि खऱ्या जालियनवाला बाग हत्याकांड ची आठवण झाली. या वेळी विविध सामाजिक संगठने सह अनेक राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध त्या ठिकाणी व्यक्त केला होता. आणि आम्हाला परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथील आंदोलन अर्ध्यावर मागे घ्यावे लागले होते. त्या नंतर मात्र मन प्रतिशोधाच्या आगीने धगधगत राहिले. आणि येणाऱ्या काळात त्या आंदोलनात जिल्हा स्तरावर सहभागी झालेल्या रोहित जगदाळे या तरुणाने पुढे नवी दिल्ली येथील जेल भरो आंदोलनात सहभागी होऊन आपल्या मनातील प्रतीशोधाच्या भावनेचा विस्तव दिल्ली गाठुनच शांत केला. तो कसा हे पुढील भागात...
.
*क्रमशः*
.
लेखक
रोहित जगदाळे पाटील
परभणी, महाराष्ट्र.
.
(पूर्व विधानसभा प्रभारी,
भारत स्वाभिमान आंदोलन.
पूर्व जिल्हा सह प्रभारी,
पतंजली युवा भारत.)
.
जिल्हाध्यक्ष
भा.ज.पा कामगार आघाडी
परभणी महानगर.
📞०९९६०९८३९९१

Comments

Popular posts from this blog

हिंदुनो आता तरी सावध व्हा.

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा स्वामी विवेकानंद का आग्रह क्यों?*

नव काँग्रेसींनो १० जनपथ ची चाकरी म्हणजे काँग्रेस नाही.