जगदाळे घराण्याचा वैभवशाली इतिहास

पवार हे मूळचे परमार राजपूत वंशीय ... महाराष्ट्रात पुढे हे पवार (मराठा) म्हणून नावारूपास आले. निंबाळकर, पोकळे, जगदाळे आदी पवारांची उप घराणी म्हणून ओळखली गेली. जसे काही भोसले पुढे घोरपडे म्हणून प्रसिद्ध झाले. धार चे महाराजा भोज ही याच परमार वंशातील. पुढे औंध चे साम्राज्य ही याच वंशाचे. बहामनी काळापासून या गावाला १६८ गावांची मसूर परगणा येथील देशमुखी होती. पुढे शिवशाही आली आणि वतनदारी बंद झाली. वतनदारी पद्धतीला फाटे देऊन १८ पगड जाती जमातीचे रयतेचे स्वराज्य उभे करणारे देशातील एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज होते..याच वतनदारी पद्धतीमुळे रयतेचे शोषण व्हायचे जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बंद करून टाकले.. याच वतनाच्या आशेने पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही आप्तेष्ट सरदार स्वराज्याशी बेईमान झाले परंतु तरीही छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिद्धांत सोडला नाही. ना पुढे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्याशी काही तडजोड केली...वतनदारी ला कधीच स्वराज्यात थारा दिला नाही.
.
स्वतःच्या घराण्याचा इतिहास शोधण्याची माझी जिज्ञासा पूर्वी पासून होती. आजही आमचे कुलदैवत साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील आहे. ज्या गावात ९० टक्के जगदाळे आहेत. गावाचे नाव कुमठे. जिथे कोल्हापूर जवळील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिर ची प्रतिकृती आहे. प्राचीन मंदिर. जगदाळे यांना वर्धनगड,अजिंक्यतारा, वसंतगड या साताऱ्याच्या आजूबाजूची सुभेदारी होती.  कोकणात ही शिरके, देसाई, राणे यांच्या समवेत जगदाळे सरदार होते. अर्थात काही मोजक्या एक्का दुक्का जगदाळे सरदारांनी मोगलशाही आणि आदिलशाही ची चाकरी केली होती. काहींना चाकरी करणे भाग पडले होते तर काही वतनासाठी धाऊन गेले होते. परंतु स्वराज्यात एक विशेष परंपरा होती. "खान तशी माती" असे परीक्षण नव्हते. कुणी स्वराज्याला फितूर झाला तरी त्याच्या बाया बापड्यांना, पोरा बाळांना त्रास दिला जात नसे. उलट स्वराज्याची सेवा करण्याची संधी दिल्या जायची. इक्का दुक्का काही जण सोडले तर सर्व जगदाळे सरदारांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली. साताऱ्याच्या गादी च्या पायाशी स्वतःचे इमान प्रामाणिक पने ठेवून अगदी पानिपत च्या लढ्या पर्यंत मराठा साम्राज्याची सेवा केली. सेनापती आबाजी राव जगदाळे, सरदार यशवंतराव जगदाळे, सरदार पिराजी राव जगदाळे असे अनेक योद्धे या घराण्यात होऊन गेले. सरदार यशवंतराव जगदाळे आणि सरदार पिराजी राव जगदाळे यांनी तर पानिपत चे मैदान दणाणून सोडले. दत्ताजी शिंदे यांच्या सोबत नजीब खान याच्या विरुद्ध बुराडी घाटी च्या युद्धात या दोन्ही सरदारांना मराठा साम्राज्या साठी वीर मरण आले.
.
रोहित जगदाळे पाटील 
परभणी, महाराष्ट्र.

Comments

Popular posts from this blog

हिंदुनो आता तरी सावध व्हा.

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा स्वामी विवेकानंद का आग्रह क्यों?*

नव काँग्रेसींनो १० जनपथ ची चाकरी म्हणजे काँग्रेस नाही.